'बोंडला'चे होणार खासगीकरण
वनखात्याचा केंद्राला प्रस्ताव; प्राणी संवर्धनाबरोबर पर्यटनाला प्रोत्साहन
पांडुरंग गुरव
पणजी : गुजरातमधील ' वनतारा 'च्या धर्तीवर राज्यातील एकमेव बोंडला प्राणी संग्रहालयाचे खासगीकरणाद्वारे संवर्धन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन असून तसा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात येणार आहे. तसे झाल्यास या प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या संवर्धनाबरोबर पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार आहे.
राज्यात पाच अभयारण्यांसह एक प्राणी संग्रहालय वजा अभयारण्य आहे. या बोंडला प्राणी संग्रहालयात सध्या विविध प्रकारचे प्राणी असून प्रामुख्याने गवे, बिबटे, अस्वल, कोल्हे, सांबर, चितळ यांच्यासह विविध प्रकारचे पक्षी आणि सरपटणारे प्राणी आहेत. वन खात्याने यापूर्वी या प्राणी संग्रहालयात हत्ती, सिंह, वाघ, पानगेंडे आणले होते. मात्र सध्या हे प्राणी नाहीत.त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची हिरमोड होतो.यासाठी वन खात्याने या प्राणिसंग्रहालयाचे संपूर्ण नूतनीकरण आणि खासगीकरण करण्याचा प्रस्ताव ठेवला असून यासाठी केंद्रीय वन पर्यावरण आणि हवामान बदल खात्याला तसा प्रस्ताव पाठवण्याचे पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत हा प्रस्ताव मान्य झाल्यास राज्यातील अथवा उद्योगपती अथवा खाजगी संस्थांनी संस्थांना हे प्राणी संग्रहालय चालवण्यासाठी देण्यात येणार आहे त्यातून सध्या या प्राणी संग्रहालयात असलेल्या प्राण्यांच्या संवर्धना बरोबर पर्यटनालाही प्रोत्साहन मिळणार आहे
राज्यातील वन विभागामार्फत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकल्प विचाराधीन आहेत. यात सरकारच्या मालकीच्या अथवा खाजगी वनक्षेत्रामध्ये पर्यावरण पूरक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. यासाठी तज्ञ आणि वन विकास महामंडळाचीही मदत घेण्यात येईल. या मार्फत इको टुरिझम, जंगल ट्रेल , फॉरेस्ट स्टडी कॅम्पला प्रोत्साहन देण्यात येईल.- विश्वजीत राणे , वनमंत्री