जीसीएच्या सचिवपदी शांबा देसाई
पणजी : गोवा क्रिकेट असोसिएशनच्या सचिवपदी शांबा देसाई यांची निवड करण्यात आली. रोहन देसाई यांची बीसीसीआयच्या संयुक्त सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. यावेळी असोसिएशन अध्यक्ष विपुल फडके, संयुक्त सचिव रुपेश नाईक, खजिनदार दया पागी आदी उपस्थित होते. राज्यात क्रिकेटच्या प्रचार - प्रसारासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे देसाई यांनी यावेळी सांगितले.