पणजी गुलालोत्सव : गोमंतकीय नागरिकांबरोबर परदेशी पाहुण्यांचाही  सहभागी

गोमंतभूमी न्यूज

पणजी: राज्याच्या प्रसिद्ध शिगमोत्सवाची वर्दी देणाऱ्या  गुलालोत्सवाने आज  सुरुवात झाली , होळीचेच हे दुसरे रूप आहे .साऱ्या गोमंतकात उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण करणारा हा महोत्सव पुढे दहा दिवस चालेल . आजच्या पणजी गुलालोत्सवात देशी परदेशी नागरिक  मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते 



















गोमंतकीय माणूस तसा उत्सवप्रियच आहे . त्यामुळे येथे वर्षभर नानाविध उत्सव महोत्सव सुरूच असतात . पण यातला  सर्वात मोठा उत्सव म्हणजे  शिगमोत्सव होय. या शिगमोत्सवाची सुरवात  गुलालोत्सवाने होते . हा उत्सव म्हणजे रंगांची बरसात आणि गाण्यांवर बेहोशी नाचणे असते . या महोत्सवाची सुरुवात ग्रामदेवता महालक्ष्मीला ओटी देऊन आणि गाऱ्हाणे घालून होते. आज महोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक मंगलदास नाईक, शांताराम नाईक यांनी महालक्ष्मी मंदिरात पूजन केले. त्यानंतर पणजीच्या आझाद मैदानावर रंगांची बरसात आणि गाण्यांचा तालावर नाचण्याला उधाण आले होते . यात सर्वच स्थरातील तरुणाईने बेहोष होऊन ताल धरला. यंदाही हा गुलालोत्सव  धडाक्यात साजरा करण्यात आला. यात गोमंतकीय नागरिकांबरोबर परदेशी पाहुणेही मोठ्या प्रमाणत सहभागी झाले होते. पुढील दहा दिवस हा महोत्सव मोठ्या उत्साहात राज्यभर सुरूच राहणार आहे.


मुख्यमंत्र्यांनी साजरी केली होळी 

राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्नी सुलक्षणा यांच्यासह होळीच्या कार्यक्रमात सहभागी नोंदवत होळीचा आनंद घेतला. हा आनंदाचा उत्साहाचा सण असून राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा होतो. होळीच्या सणामध्ये नैसर्गिक रंगांचा वापर करावा आणि इतरांना इजा होईल असे प्रकार टाळावेत.