फोंड्यात १५ एप्रिलपासून पे पार्किंग : नगराध्यक्ष
गोमंतभूमी न्यूज
फोंडा: फोंडा नगरपरिषदेने (पीएमसी) १५ एप्रिलपासून शहरात ' पे पार्किंग ' सुरू केले जाईल. अशी माहिती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आनंद नाईक यांनी दिली आहे.
नगराध्यक्ष नाईक म्हणाले पार्किंगचे नियमन करणे आणि वर्दळीच्या ठिकाणी गर्दी कमी करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. वाहनचालकांना आता नियुक्त केलेल्या ठिकाणी पार्किंग करण्यासाठी शुल्क भरावे लागेल, शुल्क आणि विशिष्ट ठिकाणांची माहिती लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. एकूणच शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, यातून महसूल ही मिळणार आहे त्यामुळे पालिकेने हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.