प्रतीक्षा खलप यांचा नेतृत्वाखाली महिला काँग्रेस होणार सक्रिय

गोमंतभूमी न्यूज

पणजी : गोव्यात महिलांवरील गुन्हे वाढत असल्याने महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे, बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेसाठी देण्यात आलेल्या ८० टक्के निधीचा भाजप सरकारकडून जाहिरातींसाठी गैरवापर केला जात आहे असे मत अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्षा अलका लांबा यांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये लांबा बोलत होत्या. यावेळी राज्य महिला प्रमुख प्रतीक्षा खलप उपस्थित होत्या लांबा पुढे म्हणाल्या राज्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. ते रोखण्यासाठी सरकार अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे सरकार सत्तेवर राहण्यास अपात्र ठरले असून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी बोलताना खलप म्हणाल्या,  राज्यात महिलांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवला जाईल. पक्ष बळकट करण्यासाठी पक्ष पातळीवर प्रशिक्षण देण्यात येईल.