केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतली भेट : विविध मुद्द्यांवर साधला संवाद
गोमंतभूमी न्यूज
पणजी : विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief minister Pramod Sawant) यांनी आज दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांची भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. दुसरीकडे राज्यात मात्र राजकीय चर्चांना उधाण असून मंत्रिमंडळातील फेरबदलाने जोर धरला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळातील फेरबदलांनी जोर धरला असून आज मुख्यमंत्री डॉ. सावंत (Chief minister Pramod Sawant) यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री शहा(Union Home Minister Amit Shah) यांची भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यात नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीतील राज्याची प्रगती, खाण क्षेत्रातील विकास यासह इतर मुद्द्यांचा समावेश होता. प्रशासकीय आणि विकासात्मक उपक्रमांना पुढे नेण्यासाठीही चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. राज्यात मात्र राजकीय चर्चांना वेग आला असून प्रामुख्याने मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत
२४ मार्चपासून विधानसभेचे अर्थसंकल्प
२४ मार्चपासून विधानसभेचे अर्थसंकल्प अधिवेशन होत असून यापूर्वीच राज्यात फेरबदल करण्यासंदर्भात केंद्रीय नेत्यांची संमती मिळवण्याकरता मुख्यमंत्री दिल्लीत गेले आहेत अशी चर्चा आहे. यात काँग्रेस मधून भाजपामध्ये आलेले दिगंबर कामत, मायकल लोबो, संकल्प आमोणकर, रमेश तवडकर यांना मंत्रिमंडळात घेण्याविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे.