गोमंतभूमी न्यूज

बेळगाव ः २१ फेब्रुवारी रोजी कर्नाटकातील बेळगाव येथे कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (केआरटीसी) च्या बस कंडक्टरला मराठीत न बोलल्याबद्दल लोकांनी मारहाण केली. त्यानंतर कन्नड आणि मराठी भाषकांमध्ये सतत वाद सुरू आहे.

या घटनेच्या निषेधार्थ आज (२२ मार्च) कर्नाटक बंदची हाक देण्यात आली आहे. कन्नड चालावली वतल पक्षाचे संस्थापक आणि माजी आमदार वतल नागराज आणि अनेक कन्नड संघटनांनी संयुक्तपणे हा बंद पुकारला आहे. बंद सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असेल.

या काळात ऑटो, टॅक्सी आणि खाजगी बस सेवा बंद राहतील असा दावा कन्नड चालावली वतल पक्षाने केला आहे.

कदंबा बसगाड्या बंद

पणजी : काही संघटनेच्या आवाहनानुसार आज कर्नाटक राज्य बंद करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर  गोवा-बेळगाव-हुबळी मार्गावर धावणाऱ्या सुमारे १३ कदंबा बसेस आज बंद करण्यात आल्या आहेत, तर गोव्याहून कारवारला जाणाऱ्या २२ बसेस सुरू आहेत, बंगळुरूला जाणाऱ्या कदंबा बसेसही सुरू आहेत, कारण त्या संध्याकाळी ५ वाजता निघतात अशी माहिती  कदंबा विभागीय वाहतूक अधिकारी रॉक लुईस यांनी दिली आहे.