शाश्वततेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल


पणजी : राज्यातील नगरपालिका क्षेत्रांत 'ग्रीन लंग्स' निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला सुरूवात झाली आहे. या उपक्रमासाठी नगरविकास विभाग, वन विभाग आणि विविध नगरपालिका प्रमुख अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे महापौर रोहित मोन्सेरात यांच्यासह राज्यातील सर्व नगरपालिकांचे नगराध्यक्ष आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 वाढत्या तापमानाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाश्वत निसर्ग-आधारित उपायांचा अवलंब करण्यासाठी केलेल्या आवाहनाने प्रेरित आहे.

  • अभियानाला राज्यातील सर्व नगरपालिकांचा पाठिंबा 

  • ओला कचरा, पावसाचे पाणी व नैसर्गिक संसाधनांचा उपयोग करून वृक्षारोपण

  • शहरी जंगलं विकसित केली जातील.

  • मियावाकी तंत्राचा वापर करून सोनसोडो डंपिंग साइटचे रूपांतर हरित क्षेत्रात केले जाईल.

  • निवडक भागांमध्ये उभ्या बागा उभारल्या जातील.

  • स्टुडिओपॉड या संस्थेच्या मदतीने या हरित जागांची रचना केली जाईल.

  • शहर विकास विभाग आणि वन विभाग या प्रकल्पाचे संयुक्त निरीक्षण करतील.

'ग्रीन लंग्स' म्हणजे काय ?

शहरांमध्ये हवामानातील बदल, प्रदूषण आणि उष्णतेचा सामना करण्यासाठी सघन झाडांची लागवड करून तयार होणारी हरित क्षेत्र होय. जी वातावरणाला गारवा, स्वच्छ हवा आणि जैवविविधतेस चालना देतात.