बेंगळूर - .पावसामुळे बाधित लढतीत पंजाब किंग्ज संघाने अग्रेसर असल्याचं सिद्ध करत बंगळुरूवर ५ विकेट्सनी विजय मिळवला. पावसामुळे हा सामना १४ षटकांचा खेळवण्यात आला. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला.
आरसीबीचे फलंदाज पंजाबच्या गोलंदाजांसमोर निरुत्तर ठरले. ६३/९ अशा स्थितीतून टीम डेव्हिडने बंगळुरूला सावरलं. डेव्हिडने ५० धावांची खेळी केली आणि बंगळुरूने ९५ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना पंजाबनेही नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. डेव्हिडच्या अर्धशतकाच्या बळावर आरसीबीने ९५ धावांची मजल मारली. पंजाबतर्फे अर्शदीप सिंग, मार्को यान्सन, युझवेंद्र चहल आणि हरप्रीत ब्रार यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या.