पणजी : राज्यात यंदा प्रथमच पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, हे महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षापासून वेळेत सुरू करावे असे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मंत्रालयात आज यासंबंधी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मंत्रालयात गोव्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना जलद करण्यासाठी आढावा बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. 
मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना काटेकोरपणे वेळापत्रकांचे पालन करण्याचे आणि केंद्र सरकारशी वेळेवर समन्वय साधण्याचे निर्देश दिले. या शैक्षणिक वर्षापासून हे महाविद्यालय सुरू होईल. यासाठी विद्यार्थ्यांपर्यंत प्रवेश प्रक्रिया पोहोचवणे आणि प्रवेश निश्चित करणे याबाबतही निर्देश दिले आहेत.