दिल्ली : सौदी अरेबियातील दम्मम येथे शनिवारी पार पडलेल्या आशियाई १८ वर्षांखालील अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या हिमांशू जाखरने भालाफेक स्पर्धेत इतिहास रचला. त्याने ६७.५७ मीटरच्या शानदार फेकीसह भारतासाठी पहिले भालाफेक सुवर्णपदक जिंकले.
या कामगिरीमुळे भारताने स्पर्धेची शानदार सांगता केली असून, एकूण ११ पदकांसह मोहीम पूर्ण केली आहे. या यशामुळे युवा खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण असून, हिमांशूच्या विजयावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.