पणजी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत या पदावर कायम राहिले, ईतर काँग्रेस पक्ष एकही जागा जिंकू शकणार नाही. असा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी सरचिटणीस खेमलो सावंत यांनी केला आहे. 
सावंत म्हणाले की, पाटकर कोणत्याही काँग्रेस सदस्याला प्रभावीपणे काम करू देत नाहीत, विशेषत साखळी मतदारसंघात. या कारणामुळे त्यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा विचार करत 'साखळी युवा मोर्चा' स्थापन करण्याची योजना आखली आहे.
काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रतिनिधींना यासंबंधी माहिती आधीच दिल्याचा दावाही सावंत यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात गोव्यात काँग्रेसच्या अंतर्गत वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.