पणजी के.बी. हेगडेवार हायस्कूलची विद्यार्थिनी आदिश्री कोरडे हिने जेईई मेन्स परीक्षेत ९९.४६ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले असून ती जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र ठरली आहे.

आदिश्री ही दहावी आणि बारावीच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. तिच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तिने पुन्हा एकदा आपल्या प्रतिभेची छाप पाडली आहे. कठोर परिश्रम, समर्पण आणि चिकाटी यांच्या जोरावर मिळवलेले हे यश तिच्या भविष्यातील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल.
शाळेच्या वतीने तसेच गोमंतकीय शैक्षणिक वर्तुळातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.