पणजी : पवित्र सप्ताहातील धार्मिक सेवांच्या पार्श्वभूमीवर, जुने गोवा येथील प्रसिद्ध बॅसिलिका ऑफ बॉम जीझस ही ऐतिहासिक चर्च पर्यटक आणि इतर अभ्यागतांसाठी काही दिवस तात्पुरती बंद राहणार आहे.
गुरुवार, १७ एप्रिलच्या सकाळपासून ते रविवार, २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत ही बंदी लागू राहणार असल्याची माहिती चर्चचे रेक्टर फादर पॅट्रिसियो फर्नांडिस, एसजे यांनी दिली.
या काळात चर्चमध्ये पवित्र धार्मिक विधी आणि प्रार्थनांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांनी शांतता राखून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले