पणजी : पेडणे येथील १७ वर्षीय दलित मुलीवर झालेल्या विनयभंग आणि जातीवरून अत्याचाराच्या धक्कादायक घटनेवर गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतीक्षा खलप यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
खलप यांनी या अमानुष घटनेचा तीव्र निषेध केला असून, पोलिस कारवाईत होत असलेल्या विलंबाबद्दल चिंता व्यक्त केली. पीडितेला तात्काळ न्याय मिळावा, यासाठी त्यांनी प्रशासनाला सजग राहण्याचे आवाहन केले.
त्यांनी फरार आरोपींना तातडीने अटक करण्याची आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, अशा घटना पुन्हा होणार नाहीत याची हमी देण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, असेही त्या म्हणाल्या.