म्हापसा : कळंगुट पोलिसांनी बागा येथील आयपीएल सट्टा रॅकेटचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अंकित राठोड (३४), बादल (३२) आणि अजय (३२) अशी आहेत.
पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत छापा टाकला आणि घटनास्थळी सट्टेबाजी चालू असताना आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत १ लॅपटॉप, ७ मोबाईल फोन आणि रोख १.१० लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. प्राथमिक चौकशीत आरोपी आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावत असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी सुरू असून, या रॅकेटचा कोणत्याही मोठ्या नेटवर्कशी संबंध आहे का, याची तपासणी केली जात आहे. कळंगुट पोलिस स्टेशनचे निरीक्षक नारायण चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. गोव्यातील पर्यटक प्रधान भागांमध्ये अशा बेकायदेशीर सट्टा रॅकेट्सवर नजर ठेवण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.