कार्डिनल केविन फेरेल म्हणाले, आज सकाळी रोमचे बिशप, फ्रान्सिस, पित्याच्या घरी परतले. त्यांचे संपूर्ण आयुष्य प्रभू आणि त्यांच्या चर्चच्या सेवेसाठी समर्पित होते.
पोप फ्रान्सिस हे पहिले लॅटिन अमेरिकन पोप होते आणि त्यांनी चर्चमध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या. त्यांच्या निधनामुळे जगभरातील ख्रिस्ती समुदायात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व्हॅटिकनमध्ये श्रद्धांजलीचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. पोप फ्रान्सिस यांच्या जागी आता नव्या पोपची निवड प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत आहेत.