पणजी :  भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनचे संयुक्त सचिव आणि गोवा ऑलिंपिक असोसिएशनचे कोषाध्यक्ष, तसेच राष्ट्रीय श्रेणी I पंच असलेले जयेश नाईक यांची खेलो इंडिया युवा खेळ - बिहार २०२५साठी ‘राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी’ म्हणून निवड झाली आहे. हे स्पर्धा ८ ते १५ मे २०२५ दरम्यान बिहारमधील रायगीर येथील राज्य क्रीडा अकादमी व बिहार क्रीडा विद्यापीठ येथे पार पडणार आहेत.

जयेश नाईक यांनी आजवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये तांत्रिक अधिकारी आणि पंच म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे गोव्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भावना व्यक्त केली जात आहे.