व्हॅटिकीन सिटी: संपूर्ण कॅथोलिक विश्वाच्या आध्यात्मिक नेतृत्वासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरवत, कार्डिनल रॉबर्ट प्रेव्हॉस्ट यांची कॅथोलिक चर्चचे २६७ वे पोप म्हणून निवड करण्यात आली. त्यांनी 'पोप लिओ चौदावा' हे नाव स्वीकारून औपचारिकरित्या पोपपदाची जबाबदारी स्वीकारली.
व्हॅटिकनमधील सिस्टीन चॅपल येथे पार पडलेल्या गुप्त मतदान प्रक्रियेनंतर 'Habemus Papam' (आमच्याकडे पोप आहे) अशी पारंपरिक घोषणा करण्यात आली.
नवीन पोप लिओ चौदावा हे आधीपासूनच चर्चमधील एक अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांची निवड जागतिक कॅथोलिक समुदायासाठी नवीन दिशा आणि आशेचा किरण घेऊन येईल, अशी प्रतिक्रिया अनेक धार्मिक नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
पोप लिओ चौदावा यांच्याकडून सामाजिक समावेश, शांती, धार्मिक संवाद आणि आध्यात्मिक मूल्यांची पुनर्स्थापना या दिशेने पुढाकार घेण्याची अपेक्षा जगभरातील कॅथोलिक श्रद्धाळूंनी व्यक्त केली आहे.
या ऐतिहासिक निवडीने संपूर्ण जगभरातील ख्रिस्ती समाजात आनंदाची लहर उमटली असून, नव्या पोपांसाठी प्रार्थना आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.