पणजी : शिरगाव येथे पारंपरिक कौल प्रसाद विधी मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. दुर्दैवाने काल घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतरही, भाविकांचा उत्साह कमी झाला नाही. काल दुपारी पार पडलेल्या या विधीला मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली.

शुक्रवारी दुपारपासून सुरू झालेला धार्मिक कार्यक्रम शनिवारी पहाटेपर्यंत रंगला. लैराई देवीच्या उत्सवात कौल प्रसाद विधी हा अत्यंत महत्त्वाचा धार्मिक सोहळा मानला जातो. या विधीत देवीच्या दर्शनासाठी आलेले भाविक कौल टाकून आपली श्रद्धा व्यक्त करतात आणि प्रसाद ग्रहण करतात.
या पारंपरिक विधीच्या माध्यमातून भक्तांनी आपल्या श्रद्धेची पुनःप्रतीती लावली आणि देवीच्या चरणी नतमस्तक होत भक्तिप्रेमाचे दर्शन घडवले.