या सेवेच्या माध्यमातून सरकारने ₹१३ कोटींहून अधिक जीएसटी गोळा केला आहे. यासोबतच, येत्या आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये गोवाMilesकडून ६० टक्के वार्षिक वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील पर्यटन विकासाला चालना देतानाच, स्थानिक वाहनचालकांना स्थिर उत्पन्नाचे साधन मिळवून देण्याचा गोवाMilesचा प्रयत्न आहे. पारदर्शक दर, GPS आधारित ट्रॅकिंग, सुरक्षिततेसाठी रिअल टाइम लोकेशन शेअरिंग यांसारख्या सुविधांमुळे ही सेवा प्रवाशांमध्ये विशेष लोकप्रिय झाली आहे.
राज्य सरकारच्या सहकार्याने, ही सेवा भविष्यात अधिक जिल्ह्यांमध्ये विस्तारण्याची शक्यता असून, गोव्यातील वाहतूक क्षेत्रात डिजिटल परिवर्तन घडवून आणण्याचा गोवाMilesचा निर्धार ठाम आहे.