त्याचबरोबर वरिष्ठ नगरनियोजक वर्तिका डागूर यांच्याकडे मुख्य नगरनियोजक (प्रशासन) तसेच मुख्य नगरनियोजक (नियोजन) या दोन महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे.
नगरनियोजन खात्याच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, या दोन्ही अधिकाऱ्यांनी तत्काळ नवीन जबाबदाऱ्या स्वीकारून कार्यभार हाती घ्यावा, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
हे बदल विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ व धोरणात्मक नियोजनाला गती देण्यासाठी करण्यात आल्याचे प्रशासनातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.