वन खात्याचा पुढाकार 

पणजी 

राज्यात गेल्या पाच वर्षात वन खात्याने १७० प्राण्यांना जीवनदान दिले आहे. यामध्ये गवे रेडे, बिबट्या,मगर,घोरपड, माकडे यासह गेल्यावर्षी एका दुर्मिळ वन मानवालाही जीवनदान देण्यात यश आले आहे.

 वन खात्याने दिलेल्या माहितीनुसार 2019 मध्ये 22, 2020 मध्ये 24, 2021 मध्ये 27 2022 मध्ये 20 ,2023 मध्ये 28 तर 2024 मध्ये सर्वाधिक 50 प्राण्यांना जीवनदान देण्यात आले.
राज्यात सहा अभयारण्य असून एक राष्ट्रीय उद्यान आहे. यात म्हादई वन्यजीव अभयारण्य, भगवान महावीर अभयारण्य वन्यजीव अभयारण्य, नेत्रावळी वन्यजीव अभयारण्य, बोलला अभयारण्य, खोतिगाव  अभयारण्य, डॉ.सलीम अली अभयारण्य आणि भगवान महावीर राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे. बऱ्याच वेळेला अभयारण्यांमधील वन्यजीव अभयारण्य सोडून खाजगी वनक्षेत्र आणि मानवी वस्तीत येतात, त्यांना शास्त्रीय पद्धतीने पकडून पुन्हा वन अभयारण्यात सोडण्यात येते. यासाठी खात्याकडे स्वतंत्र रेस्क्यू पथक असून ते २४ तास सक्रिय असते. या पथकाकडून सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये साप आणि घोरपडी मोठ्या प्रमाणामध्ये पकडल्या जातात.