महिला काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष प्रतीक्षा खलप शपथविधी
पणजी : गोवा प्रदेश काँग्रेसमधील काही जणांचे वर्तन बेशिस्तचे असून नेत्यांची अशी वागणूक यापुढे सहन केली जाणार नाही. अशा व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल. असे प्रतिपादन काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केले आहे. महिला काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष प्रतीक्षा खलप शपथविधी सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ठाकरे पुढे म्हणाले, ज्यांना पक्ष सोडायचा आहे, त्यांनी अवश्य सोडावा. पक्ष कोण्या एका व्यक्तीवर चालत नाही तर अमित पाटकर म्हणाले काँग्रेसमधीलच काहीजण पक्षाला मागे खेचण्याच्या प्रयत्नात. अशांना शोधून काढणे आवश्यक. पक्षाबाबत अफवा पसरवत असलेल्यांची नावे प्रदेश समितीला सांगा, पक्ष अशांवर कडक कारवाई करेल.