करंजाळे मासळी, स्मशानभूमीचे नूतनीकरण



गोमंतभूमी न्यूज

पणजी : पणजी महानगरपालिकेचे २०२५- २६ चा १२० कोटी रुपयांचा नियोजित अर्थसंकल्प तयार करण्यात येत असून प्राधान्याने करंजाळे मासळी मार्केट आणि सांतइनेज स्मशानभूमीचे नूतनीकरण केले जाईल, अशी माहिती महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिली आहे. इतर विकास कामांसाठी 18 ते 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे सध्या पणजी मध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकासकामे सुरू असून ती कामे ३१ मे पर्यंत पूर्ण केली जातील, असेही ते म्हणाले.