शिगम्याची धूम - पणजी मिरवणूकीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात


पणजी :  शिगमोत्सवाच्या निमित्ताने निघालेल्या
भव्य चित्ररथांच्या मिरवणुकीने स्थानिकांसह देश विदेशातील पर्यटक मंत्रमुग्ध झाल्याचे पाहायला मिळाले.
ढोल ताशांच्या गजरात आणि ओस्सायच्या जयघोषात पणजीतील प्रसिद्ध शिगमोत्सवाला जुन्या सचिवालयासमोर समोरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यात हस्ते सुरुवात झाली. यावेळी पर्यटन मंत्री रोहन खंवटे, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मंगलदास नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

लोकपरंपरा आणि लोकसंस्कृतीच दर्शन देणारा हा उत्सव म्हणजे ढोल, ताशे आणि समेळाच्या गजरात पंढरीच्या पांडुरंगपासून ग्रामदेवता जयघोष होय.
आजच्या रोमटामेळ पथकात याचा पदोपदी अनुभव येत होता. रोमटामेळ बरोबरच  धालो ,फुगडी , घोडेमोडणी ,गोफ , वीरभद्र सारखे लोकनृत्य सादर केली. कालच्या पणजी शिगमोत्सवचे आकर्षण ठरले ते भव्य चित्ररथ. यात ऐतिहासिक पौराणिक आणि चालू घडामोडींवरील चित्ररथांचे संख्या खूप होती. त्यावर साकारलेले भव्य देवतांचे पुतळे, केलेली आकर्षक रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.