पणजी : आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आमदार केदार नाईक यांच्या उपस्थितीत पिळर्ण पंचायतीच्या सभागृहात स्थानिक नागरिकांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आरोग्य संचालक डॉ. रूपा नाईक, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. शिवानंद बांदेकर, गोवा दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठता डॉ आयडा नरोन्हा, डॉ. प्राजक्ता उपस्थित होते
राणे म्हणाले , हे शिबीर केवळ वैद्यकीय उपक्रम नाही, तर कोणत्याही आर्थिक भाराशिवाय प्रत्येक दारापर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचेल याची खात्री करण्याची आमची वचनबद्धता आहे. या शिबिरामध्ये विविध विशेष सेवांद्वारे तज्ञांचा सल्ला आणि तपासणी केली जात आहे.