पांडुरंग गुरव
पणजी
राज्यातील क्रिकेटचा दर्जा वाढवण्याबरोबरच नव्या खेळाडूंना मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने यशस्वी जयस्वाल नंतर आता सूर्यकुमार यादव आणि ध्रुव जुरेल यांच्या नावाची चर्चा असून हे दोन्ही खेळाडू भविष्यात गोवा संघांकडून रणजी खेळू शकतात. यासंबंधीची प्राथमिक चर्चा झाली असून संबंधित क्रिकेट असोसिएशनची परवानगी आवश्यक आहे.
गोवा क्रिकेट असोसिएशनला सध्या मध्यम गतीच्या गोलंदाजाची गरज आहे.ही भूमिका अर्जुन तेंडुलकर पार पाडत आहे. याशिवाय फलंदाज विकेटकीपरची निदान गरज आहे. हे लक्षात घेऊन असोसिएशनने भारताचा आंतरराष्ट्रीय स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आणि तरुण बॅट्समन विकेटकीपर ध्रुव जुरेल याच्याशी प्राथमिक चर्चा सुरु केली आहे. सूर्यकुमार यादव सध्या आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्सचा खेळाडू आहे. तर जुरेल राजस्थान रॉयल्स कडून खेळत आहेत. यापैकी जुरेल याच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यासाठी बीसीसीआयचे संयुक्त सचिव रोहन देसाई प्रयत्नशील आहेत. दुसरीकडे सूर्यकुमार यादव यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून याबाबत सध्या तरी कोणतीच चर्चा झालेली नसल्याचे म्हटले आहे.
गोवा क्रिकेट असोसिएशनकडून यशस्वी जयस्वाल खेळण्याचे निश्चित झाले असून, अन्य खेळाडूंसोबत आमची प्राथमिक चर्चा सुरू आहे. यातून जे खेळाडू गोवा क्रिकेट असोसिएशनसाठी अनुकूल असतील, त्यांना असोसिएशन सोबत घेण्यात येईल. प्रामुख्याने राज्यातील क्रिकेट वाडी बरोबर खेळाचा दर्जा वाढवणे नव्या खेळाडूंना मार्गदर्शन करणे यासाठी अशा खेळाडूंची नितांत गरज असते.
शांबा देसाई, सचिव, गोवा क्रिकेट असोसिएशन