आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची ४३.२० कोटी किंमत इतकी आहे.
गोवा पोलिसांची आतापर्यंतची ही सर्वात मोठी अंमली पदार्थ विरोधी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी सडा वास्को येथे राहणाऱ्या पती पत्नीसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निबू विंसेन्ट रा. बायना, वास्को ,रेश्मा वाडेकर, रा. सडा, वास्को हिचा पती मंगेश वाडेकर, रा. सडा, वास्को याना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून या तिघांना ताब्यात घेण्यात आले असता त्यांच्याकडे चॉकलेट आणि कॉफीची ३२ पाकिटे जप्त करण्यात आली. हे आरोपी अशा स्वरूपात कोकेन सप्लाय करत होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्मा आणि मंगेश यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.
चौकट
रेश्मा वाडेकर ही मुख्य सूत्रधार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ती परदेशात अधूनमधून जात होती आणि अलीकडेच थायलंडहून परतली आहे, त्यामुळे प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट कनेक्शन असल्याची शक्यता आहे.
मंगेश वाडेकर स्मशानभूमीत काम करतो, त्यामुळे या ड्रग रॅकेटमागे कोणीतरी बलाढ्य व्यक्ती असू शकते, त्यांचीही अटक होऊ शकते अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
यंदा आतापर्यंत ५५ कोटीचे अंमली पदार्थ जप्त
२०२४ मध्ये गोवा पोलिसांनी १० कोटींचे अंमली पदार्थ पकडले होते २०२५ मध्ये आतापर्यंत ५५ कोटींची अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
गोवा पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या अंमली पदार्थ कारवायांमधली ही सर्वात मोठी कारवाई केल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलीसांचे अभिनंदन केले आहे. ही कारवाई अंमली पदार्थ तस्करी विरुद्धच्या सुरू असलेल्या लढाईत सरकारची वचनबद्धता तीव्रदक्षता आणि कायदा अंमलबजावणीसाठीच्या संस्थांची व्यवसायिकता दर्शवते.पोलिसांच्या या यशामुळे राज्यातील अमली पदार्थ विरोधातील लढाईला नवे बळ मिळाले आहे