कारवाईची मुख्यमंत्र्याकडे केली मागणी
पणजी : गोव्यात सध्या ४ ते ५ हाऊजी माफिया सक्रिय आहेत आणि त्यांच्याकडे एवढा मोठा निधी कुठून येतो याचा अंदाज नाही, अशी चिंता गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष कायतानो फर्नांडिस यांनी व्यक्त केली असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे..
या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन, सरकारने या माफियांवर लक्ष ठेवावे व त्यांच्याविरोधात तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
कायतानो फर्नांडिस म्हणाले, हाऊसी माफियांच्या गैरप्रकारांमुळे खेळ आणि सामाजिक वातावरणावर नकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे.