पणजी : कला अकादमी मध्ये १३ एप्रिल रोजी मराठी नाटकावेळी प्रकाशातील चढ-उतार ( फ्लिकर) झाल्याच्या प्रकारामागे मानवी चूक नव्हे, तर तांत्रिक समस्या जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी आज दिली आहे.
मंत्री गावडे यांनी सदस्य सचिवांना या संदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून, विद्यमान लाईट अपग्रेड करण्याची प्रक्रिया हाती घेण्याची तयारी असल्याचेही सांगितले. या प्रकारामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल मंत्री गावडे यांनी खेद व्यक्त करत, भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.