पणजी : राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेत महत्त्वाच्या भूमिका बजावणाऱ्या पोलीस दलात गृह खात्यांना मोठे बदल केले असून सुमारे ५० पोलीस निरीक्षकांसह अधीक्षकांच्याही बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमुळे पोलीस दलात खळबळ आहे. यापूर्वी अनेक पोलिसांच्या बदल्या होऊनही नव्या जागेवर ते रुजू झालेले नाहीत. त्यामुळे आता अशा कर्मचाऱ्यांना सरकारने शेवटचा इशारा देत तातडीने नव्या जागेवरती रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत.
यापूर्वी बदली आदेश देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना अद्याप कामावर ठेवण्याच्या प्रकारांमुळे, स्टेशन आणि 0युनिट प्रभारींना जबाबदार धरण्याचा इशारा दिल्यानंतर गोवा पोलिस विभागाने मोठी कारवाई करत ५० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.
ही कारवाई अचानक करण्यात आली असून, शिस्तबद्धता आणि कार्यक्षमतेला प्राधान्य देण्यासाठी ही पावले उचलण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. आता संबंधित निरीक्षकांनी तात्काळ नव्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
टीकम सिंग दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक :
गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांबाबत विविध प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. आता या ठिकाणी अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अधीक्षक टीकम सिंग यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी दक्षिण गोव्याच्या जुन्या पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांची बदली करण्यात आली आहे.