पणजी : गोवा येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाची इमारत आयईडीच्या साहाय्याने उडवून देण्याची धमकी देण आली आहे. एका निनावी ईमेलद्वारे मिळाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. हा ईमेल प्राप्त होताच पर्वरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तसेच बॉम्ब शोध व निकामीकरण पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
सुरक्षा कारणास्तव न्यायालयाची इमारत काही काळासाठी रिकामी करण्यात आली असून, संपूर्ण परिसर सील करून तपासणी सुरू आहे. पोलिस आणि विशेष पथकांनी संपूर्ण न्यायालय परिसरात शोधमोहीम राबवली. सध्या पर्यंत कोणताही स्फोटक पदार्थ सापडलेला नाही, अशी माहिती प्राथमिक अहवालातून समोर येत आहे.
गोवा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी सायबर क्राइम विभागालाही सतर्क करण्यात आले आहे. या धमकीमुळे न्यायालयीन कामकाजावर काहीसा परिणाम झाला असून, संबंधित यंत्रणा पुढील खबरदारीच्या उपाययोजना घेत आहेत.