२४ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता साखळी येथील रवींद्र भवनात एक भव्य वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात विविध आजारांवर निदान आणि सल्ला देण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहतील. या शिबिराचे उद्घाटन स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे.
त्यानंतर सकाळी १० ते ११.३० या वेळेत मुख्यमंत्री मडगाव येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात उपस्थित राहून कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. दुपारी १२ ते १.३० या वेळेत ते पणजी येथील भाजप कार्यालयातही भेट देणार असून, तेथे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपलब्ध असतील.
सायंकाळी ५ ते ६ या वेळेत मुख्यमंत्र्यांची भेट म्हापसा येथील भाजप कार्यालयात होणार असून, या ठिकाणीही ते शुभेच्छा स्वीकारतील.
या सर्व कार्यक्रमांनंतर सायंकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत साखळी रवींद्र भवनात एक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री उपस्थित राहून उपस्थित नागरिक, कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.