पणजी  : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, गोव्यात २५ ते २७ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आलेला काजू महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. गोवा सरकारच्या वतीने यासंदर्भात अधिकृत निवेदन जाहीर करण्यात आले आहे.

या महोत्सवासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्थानिक उत्पादने आणि पारंपरिक खाद्यपदार्थांचे सादरीकरण होणार होते. मात्र, देशभरात पसरलेल्या हल्ल्याच्या तीव्र प्रतिक्रिया आणि दुःखद वातावरणाच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने महोत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.