हॉटेल बंद करण्याचे आदेश
म्हापसा : येथील प्रसिद्ध हॉटेलच्या परिसरात गंभीर अस्वच्छता आढळून आल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने हॉटेल तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, हॉटेलमध्ये स्वच्छता आणि अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करण्यात आले असून, सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ शकते म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. एफडीएने हॉटेलच्या स्वयंपाकघराची तपासणी केल्यानंतर, स्वच्छतेच्या बाबतीत गंभीर त्रुटी आढळल्या होत्या. आरोग्य विभागाने अशा प्रकारच्या घटनांवर कारवाईसाठी विशेष मोहीम राबवण्याचा इशाराही दिला आहे.