रसायनाने पिकविलेले आंबा, केळी जप्त 
एफडीएने कारवाई ; रासायनिक तपासणीसाठी नमुने 

पणजी : फळांमध्ये रसायनांचा वापर रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने संपूर्ण राज्यभरातील आंबा विक्रेत्यांवर सखोल तपासणी मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत म्हापसा यार्डमधील दोन युनिट्सवर छापे टाकून १८० आंब्याच्या पेट्या आणि ४५० किलो केळी जप्त करण्यात आली आहेत. तपासणी दरम्यान संशयास्पद फळे आढळल्याने २४ आंब्यांचे नमुने आणि इतर ४ प्रकारच्या फळांचे नमुने रासायनिक अवशेष विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. एफडीएने अशा छाप्यांद्वारे फळांमध्ये घातक रसायनांचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच नागरिकांनी फळ खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.