पणजी : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राधा मोहनदास अग्रवाल, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली वक्फ सुधार जनजागरण अभियानावर राज्यस्तरीय कार्यशाळा आज आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाला राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस व आमदार जोशुआ डिसोझा, तसेच राज्य सरकारमधील मंत्री, आमदार, आघाडीतील भागीदार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेद्वारे वक्फ मालमत्तांचे संरक्षण, पारदर्शकता आणि जनजागृती वाढवण्यावर भर देण्यात आला.
