पणजी : राज्यात २०२७ च्या विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन किरण कांदोळकर, दयानंद मांद्रेकर यांनी जातीय जनगणनेसाठी प्रयत्न सुरू केली आहेत. यानुसार राज्यात ओबीसी समाजाच्या वस्तुनिष्ठ आकडेवारी समोर येणार आहे.
भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी काल २०११ च्या जनगणनेत जातीची माहिती का समाविष्ट करण्यात आला नाही, हा प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान, अशोक नाईक आणि देवानंद नाईक यांच्या नेतृत्वाखालील गटाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेत जनगणना केवळ भंडारी समाजापुरती मर्यादित न ठेवता सर्व ओबीसी जातींचा समावेश करण्याची विनंती केली.
या मागणीमुळे राज्यातील ओबीसी समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.