पणजी : गेल्या १५ वर्षांपासून भाजप केवळ राजकीय हेतूंसाठी भंडारी समाजाचा वापर करत आहे, असा गंभीर आरोप आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर यांनी केला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भंडारी समाजातील काही माजी आमदार व नेत्यांसोबत नुकतीच बैठक घेतली होती. यावर प्रतिक्रिया देताना पालेकर म्हणाले की, ही भेट म्हणजे पक्षाच्या समाजात फूट पाडण्याच्या प्रयत्नांचीच पुनरावृत्ती आहे. त्यांनी भाजपवर समाजातील एकतेला बाधा आणण्याचा आरोप करत याचा तीव्र निषेध केला.