पणजी : तिसवाडी तालुक्यातील गोवा वेल्हा, सांतेनेज आणि पणजी परिसरातील हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) विशेष देखरेख मोहिमेदरम्यान जलद आणि ठोस कारवाई केली. एकूण १२ परिसरांची तपासणी करत ४ किचन बंद करण्याचे निर्देश देत दंडात्मक कारवाई केली आहे.या कारवाई मध्ये १८ जून रोडवरील एक चहाचे हॉटेल, सांतेनेज व गोवा वेल्हा येथील एक अशा एकूण ४ किचनचे कामकाज अयोग्य, अन्न स्वच्छता आणि गैर-अनुपालनाच्या कारणास्तव तात्पुरते स्थगित करण्यात आले. किरकोळ नियमभंगाबाबत तीन विक्रेत्यांवर ११,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई एफडीएच्या अन्न सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेचे उदाहरण ठरली आहे. ही मोहीम रिचर्ड नोरोन्हा (नियुक्त अधिकारी), श्रद्धा खुटकर (वरिष्ठ एफएसओ) आणि संचालक श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.