फोंडा: गोवा मराठी अकादमी फोंडा प्रभाग, गुरुकृपा प्रकाशन आणि विद्यावृद्धी संस्था फोंडा यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य अभिवाचन, शृंखला उपक्रमाअंतर्गत कवयित्री श्रुती सागर हजारे यांच्या मनदर्पण या कविता संग्रहाचे प्रकाशन आणि कविता वाचन आयोजित करण्यात आले आहे. रविवारी २० एप्रिल रोजी सायं. ठीक ४ वाजता विद्यावृद्धी (किड्स नेस्ट) शाळेच्या संकुलात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्रुती सागर हजारे या प्रसिद्ध कवयित्री, लेखिका, दूरदर्शन मुलाखतकार, व्याख्याती तसेच नाट्यकलाकार आहेत. त्यांनी लिहिलेल्या कविता यावर्षीच्या ९ दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या आहेत.