मुख्यमंत्र्यांच्या संकेतानंतर मंत्रिमंडळ फेरबदलाची जोरदार चर्चा
पणजी : मडगावात काल आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 'मडगावला लवकरच अच्छे दिन येणार आहेत असे संकेत दिल्याने माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे मंत्रीपद निश्चित झाल्यात जमा आहे. आता त्यांच्यानंतर अन्य कोण ? आणि हे फेरबदल कधी होणार, याची जोरदार उत्सुकता लागून राहिली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना मंत्रिपद दिले जाणार हे जवळपास निश्चित मानले जाते. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईकही या मेळाव्यात उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना मुख्यमंत्री सावंत यांच्या वक्तव्यानंतर नव्याने बळ मिळाले आहे.
- मंत्रिमंडळ बदलाच्या चर्चा पुन्हा तेजीत
- भाजपचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष निवड पुढील आठवड्यात
- त्यानंतरच मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता
- कामत यांचे मंत्रिपद निश्चित इतरांची उत्सुकता
- पुन्हा मायकल लोबो दिलायला लोबो, संकल्प आमोणकर, निलेश काब्राल , रमेश तवडकर यांच्या नावाची चर्चा