पणजी : उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष शंकर चोडणकर यांनी ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या केंद्र सरकारच्या संकल्पनेला आणि वक्फ विधेयकातील दुरुस्तीला खुले समर्थन दर्शविले आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या धोरणांना देशाच्या एकात्मतेसाठी आणि निवडणूक प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी उपयुक्त ठरवलेल्या या पार्श्वभूमीवर २४ एप्रिल २०२५ रोजी उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या रौप्यमहोत्सवी समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या महत्त्वाच्या सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच पंचायत मंत्री श्री. मावीन गुदिन्हो प्रमुख उपस्थिती लावणार आहेत.या कार्यक्रमात उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय गावडे, सदस्य, सिद्धेश नाईक आणि इतर जिल्हा परिषद सदस्यही सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.