पणजी : आर्टरेव्होल्यूशनच्या स्मृती शिरसाट (म्हापसा) यांच्या आयोजनाखाली गोव्यातील मरणपावत चाललेल्या 'गोवा कावी कला'ला जीवनदान देण्यासाठी एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत मुंबई, लातूर, पुणे आणि जर्मनी येथून आलेले ११ कलाकार सहभागी झाले होते.

सागर मुळे या कार्यशाळेच्या माध्यमातून गोवा कावी कला जोपासण्याचा प्रयत्न करत आहेत. या कलाकारांचा म्युझियम ऑफ गोवा (MOG) ला देखील भेट देण्याचा कार्यक्रम आहे.

गोव्याच्या सांस्कृतिक वारशाचा प्रचार आणि संवर्धन करण्याचे कार्य स्मृती शिरसाट आणि यशोधन भोरडे करत आहेत.