पणजी :  गोव्याच्या फुटबॉलचा अभिमान एफसी गोवा संघाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. त्यांनी सुपर कप २०२४-२५ स्पर्धेचे विजेतेपद पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले. भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात एफसी गोवाने जमशेदपूर एफसीचा ३-० ने पराभव करत दुसऱ्यांदा हा किताब जिंकला.

स्पर्धेत उत्तम खेळ सादर करणाऱ्या एफसी गोवाकडून स्पेनच्या बोर्जा हेरेराने दोन गोल, तर सर्बियन डेजान ड्रॅझिचने एक गोल करून विजयावर शिक्कामोर्तब केला. गोवाने यापूर्वी २०१९ मध्ये सुपर कप जिंकला होता, आणि आता २०२५ मध्येही ते विजयी ठरले आहेत.

संपूर्ण सामन्यावर एफसी गोवाचा दबदबा पाहायला मिळाला. त्यांची आक्रमक आणि शिस्तबद्ध खेळी पाहून प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केला. प्रशिक्षक, खेळाडू व समर्थकांनी मैदानातच जल्लोष केला.