पणजी  : राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की, सनातन धर्म व सनातन राष्ट्राच्या प्रचारासाठी संस्थेचे योगदान उल्लेखनीय आहे. आज गोवा केवळ पर्यटनासाठी नव्हे, तर अध्यात्मिक उन्नतीसाठी ओळखला जात आहे.
ते म्हणाले, "पूर्वी लोक गोव्यात सूर्य, वाळू आणि समुद्रासाठी यायचे. मात्र आता ते मंदिरांना भेट देण्यासाठी, अध्यात्मिक अनुभवासाठी येतात. गोव्याची ओळख आता बदलत आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "जो कोणी भारतात राहतो तो हिंदुस्थानी आहे, मग त्याचा धर्म कोणताही असो. गोवा हे देशातील पहिले राज्य आहे जिथे समान नागरी कायदा यशस्वीरित्या लागू करण्यात आला आहे. ही गोव्यासाठी आणि देशासाठी अभिमानाची बाब आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे गोव्यातील धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.