नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ या महत्त्वपूर्ण मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (सोमवार) रात्री ८ वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती अधिकृतपणे जाहीर केली आहे.

या संबोधनामध्ये मोदी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर महत्वाची माहिती देण्याची शक्यता असून, यासोबतच राष्ट्रीय सुरक्षेबाबतचे मुद्दे, सरकारची आगामी रणनीती आणि नागरिकांना केलेली आवाहने यावर भाष्य करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’ला मिळालेलं यश हे संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगण्यात येत आहे.