दिल्ली  :: अरुण जेटली स्टेडियमवर काल रात्री झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने यजमान दिल्ली कॅपिटल्सचा १० गडी राखून पराभव केला. या दणदणीत विजयामुळे गुजरात टायटन्सने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले असून प्ले-ऑफसाठी पात्रता निश्चित केली आहे.

या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्स संघांनीही प्ले-ऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

दरम्यान, चौथ्या आणि अंतिम स्थानासाठी चुरस तीव्र झाली असून मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स या संघांमध्ये अंतिम स्थानासाठी संघर्ष रंगत आहे.

IPL चे शिल्लक सामने अत्यंत रोचक होण्याची शक्यता असून, कोणता संघ शेवटच्या प्ले-ऑफ जागेसाठी पात्र ठरेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.