मुंबई ::इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ चा हंगाम तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने जाहीर केले.
देशभरात वाढलेल्या सुरक्षेच्या चिंतेमुळे आणि परदेशी खेळाडूंनी व्यक्त केलेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर, हा हंगाम सध्या स्थगित ठेवण्यात येत आहे. बीसीसीआयने परिस्थितीवर बारीक नजर ठेवून लवकरच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही स्पष्ट केले आहे.
धर्मशाला येथे अलीकडेच अर्धवट थांबवण्यात आलेल्या सामन्याने सुरुवात झालेल्या अनिश्चिततेस अखेर मुहर लागली आहे